14 वर्षाखालील गटात आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या कु.सई दिपक साठे हिने प्रथम क्रमांक पटकाविला

महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर, पुणे    17-Oct-2026
Total Views |

student success3
 
पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटात आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या कु.सई दिपक साठे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची निवड नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली. सईचे प्रशालेच्या वतीने खूप खूप अभिनंदन