Objectives of the Unit – शाळेची उद्दिष्टे
महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर, पुणे 30-Sep-2026
Total Views |
शैक्षणिक उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे तसेच दैनंदिन अध्यापनातून अध्ययन निष्पत्तीची पूर्तता करणे.
- गणित, विज्ञान, भाषा व इतर विषयांमध्ये मूलभूत संकल्पना दृढ करणे.
- प्रगत व अप्रगत विद्यार्थिनींसाठी आवश्यक त्या पूरक व उपचारात्मक अध्यापनाची अंमलबजावणी करणे.
- गुणवंत विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रोत्साहन देणे.
व्यक्तिमत्त्व विकास
- आत्मविश्वासपूर्ण व स्वतंत्र विचार करणाऱ्या विद्यार्थिनी घडविणे.
- नेतृत्व, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि संघभावना विकसित करणे.
- विद्यार्थिनींमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन, जबाबदारी आणि सहकार्याची भावना निर्माण करणे.
कौशल्य विकास
- डिजिटल साक्षरता व तंत्रज्ञानाचा योग्य वापर विकसित करणे.
- व्यावसायिक व जीवनोपयोगी कौशल्यांची ओळख करून देणे.
- कला, संगीत, क्रीडा, योग, विज्ञान व विविध सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींना सहभागी करून घेणे.
मूल्यशिक्षण व सामाजिक बांधिलकी
- प्रामाणिकपणा, समानता, बंधुता, सहिष्णुता आणि संवेदनशीलता या मूल्यांची जोपासना करणे.
संविधानिक कर्तव्ये व नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे.
- स्त्री-सन्मान, स्त्री-सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे.
आरोग्य व सुरक्षितता
- विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे.
- सुरक्षित व बालस्नेही शालेय वातावरण निर्माण करणे. आरोग्य, स्वच्छता, पोषण, योग व क्रीडा यांना प्रोत्साहन देणे.
पर्यावरण
- पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, ऊर्जा बचत आणि कचरा व्यवस्थापन याबाबत विद्यार्थिनींमध्ये जाणीव निर्माण करणे.
- शाश्वत विकासाच्या संकल्पनांशी विद्यार्थिनींची ओळख करून देणे.